महाविकास आघाडीचं पॅकेज ऐकून भाजपचे डोळे पांढरे होतील – हसन मुश्रीफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । आमचं सरकार बारा बलुतेदार आणि कामगारांसाठी मोठं पॅकेज जाहीर करेल तेव्हा भाजपचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला आहे. त्यामुळं केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचे संकेत हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

भाजपने महाराष्ट्रात ५० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलनही छेडले आहे. त्यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी हे संकेत दिले आहे. केंद्राने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यात सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंगमध्ये खूप फरक असतो. या पॅकेजने काहीही फायदा होणार नाही. हे कसले पॅकेज? अशा शब्दांत मुश्रीफ यांनी केंद्राच्या पॅकेजची टर उडवली.

३ लाख कोटी कर्ज एमएसईबीला देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. बँका दारात उभ्या करत नाहीत, त्यांना कर्ज कोणी देत नाही. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा होत नाही, असं सांगतानाच आमचं सरकार जेव्हा पॅकेज जाहीर करेल तेव्हा भाजपचे डोळे पांढरे होतील, असा दावा त्यांनी केला.

जीएसटीची थकबाकी गेली तरी कुठे?
जीएसटीच्या मुद्द्यावरून मुश्रीफ यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. जीएसटीच्या १२ हजार कोटीची थकबाकी कुठे गेलीय? कोविड विरोधात लढण्यासाठी पीएम केअर फंडमधून आतापर्यंत किती पैसा दिला? पीएम केअर फंडला सर्वाधिक पैसा पीएम केअर फंडला गेला. पण महाराष्ट्राला ४०० कोटी दिले. उत्तर प्रदेशला १५०० कोटी दिले, हा कुठला न्याय? असा सवालही त्यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment