राज्यात मागील 24 तासात 51 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; एकूण संख्या 1809

0
31
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताच असून कोरोनाने खाकी वर्दीतील योध्यांवर सुद्धा आपला हल्ला केला आहे. गेल्या 24 तासात 51 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या 1809 वर पोहोचली आहे. या 1809 पोलिसांमध्ये 194 पोलीस अधिकारी आहेत आणि 1615 पोलीस कर्मचारी आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 18 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 678 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार पोहोचला आहे. तर आज एकाच दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्ण राज्यात आढळले आहेत. राज्यात काल 3041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. अशारीतीने राज्याचा कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे.

दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 1635 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1196 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here