आनंदाची बातमी!! महाराष्ट्र निर्बंध मुक्त; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे.राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मास्कची सक्ती नसेल, मास्क वापरणे हे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्सहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

मागील २ वर्षांपासून कोरोनामुळे राज्यात भयावह परिस्थिती होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लादले होते. त्यानुसार रेल्वे प्रवास, चिंत्रपटगृह, लग्न समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम यासाठी निर्बंध लादण्यात आले होते. मधल्या काळात कोरोना निर्बंधांत शिथीतला आणली होती मात्र निर्बंध उठवण्याचा निर्णय झाला नव्हता. मात्र आता राज्यातील कोरोना परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर हे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.

Leave a Comment