स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Sudhir Mungantiwar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे सरकारला सत्तेत येऊन दीड वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी त्यांना अजूनपर्यंत एमपीएससीची पदे भरता आली नाहीत. यामुळे स्वप्निल लोणकर या तरुणाने सर्व परीक्षा पास करूनही मुलाखत, नियुक्ती झाली नाही यामुळे खचून जाऊन आत्महत्या केली आहे. यामुळे राज्य सरकारने स्वप्निलच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्यावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली आहे.

एमपीएससीमध्ये पदे भरता येत नाहीत. तो मुलगा आईला सांगतो मी प्रिलिम पास केली, मेन पास केली, पण इंटरव्ह्यू झाला नाही आणि आत्महत्या करतो. किती गंभीर विषय आहे. हे कठोर, दगडी मनाचे सरकार आहे. स्वप्निलच्या आईच्या मुलाखतीचा व्हिडीओ तुम्ही सभागृहात दाखवा, असे आवाहनदेखील सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला केले आहे.

बच्चूभाऊ तुम्ही बोलू नका…
सुधीर मुनगंटीवार हे स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवर विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडत असताना राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी बोलायला सुरुवात केली. बच्चूभाऊनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुनगंटीवार यांनी बच्चूभाऊंना तुम्ही बोलू नका, एवढा गंभीर विषय आहे, तुम्ही एवढे संवेदनशील आहात, कृपया तुम्ही बोलू नका, असे आवाहन केले. यानंतर राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे शांत झाले.