हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल (Mahatma Gandhi Assassination) एक दावा समोर आला आहे. नथुराम गोडसेने (Nathuram Godse) मारलेल्या गोळ्यांमुळे गांधीजींचा मृत्यू झाला नाही असा मोठा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्या पुस्तकातून करण्यात आला आहे. रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं नवी दिल्लीत प्रकाशन झालं आहे. मात्र या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे कि गांधीवर चालवलेल्या गोळ्या या गोडसेंच्या बंदुकीतून नव्हे तर वेगळ्या दिशेनं आल्या होत्या. आपण हा दावा अगदी पुराव्यानिशी करत असल्याचे सुद्धा रणजित सावरकर यांनी सांगितलं.
महात्मा गांधीजींची हत्या (Mahatma Gandhi Assassination) नथुराम गोडसेने केली नाही, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. नथुराम गोडसे याने झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या वेगवेगळ्या होत्या. महात्मा गांधी यांच्या शरिरात सापडलेल्या गोळ्या या वेगळ्या दिशेने आल्या होत्या. ज्या गोळीने महात्मा गांधींचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून आलीच नव्हती. गोडसेंचा समज झाला की त्यांनीच गोळ्या मारल्या पण खऱ्या गोळ्या दुसऱ्याच कोणीतरी मारल्या होत्या असा मोठा दावा या पुस्तकातून रणजित सावरकर यांनी केला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.
गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या ते तपासायला हवे- Mahatma Gandhi Assassination
रणजित सावरकर यांचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या पुस्तकावर आणि त्यातील दाव्यांवर प्रतिक्रिया देताना म्हंटल कि, कायदेशीर गोष्टींचा विचार करूनच आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय. गांधींवर गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या ते तपासायला हवे. त्यासाठी सरकारनं यावर एक आयोग नेमावा आणि त्यावर चौकशी सुरू करावी असे आवाहनही रणजित सावरकर यांनी केलं. सावरकरांच्या या दाव्यामुळे हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.