माजी नगराध्यक्षांच्या पतीचा मृतदेह वेण्णालेकमध्ये आढळला; महाबळेश्वर ट्रेकर्स व एनडीआरएफच्या संयुक्त कारवाईला यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी |  महाबळेश्वर येथील वेण्णालेकमध्ये महाबळेश्वर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ज्योती कांदळकर यांचे पती दिपक कांदळकर यांनी आत्महत्या केली होती. गत चार दिवसांपासून महाबळेश्वर ट्रेकर्स व कोलाड स्कुबा डायव्हर्स यांनी शोधकार्य सुरु ठेवले होते. तपासकार्य तात्काळ उरकलं जावं यासाठी अखेर एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि एनडीआरएफच्या संयुक्त कामगिरीला चौथ्या दिवशी यश मिळालं आहे.

मागील चार दिवसांपासून प्रशासन, नगरपालिका यांच्यामार्फत महाबळेश्वर ट्रेकर्स, कोलाड स्कुबा डायव्हर्स , तसेच एनडीआरएफ टीमच्या माध्यमातून वेण्णालेक महाबळेश्वर येथे दिपक कांदळकर यांचं शोधकार्य सुरु होते. महाबळेश्वरच्या तहसिलदार सुषमा पाटील, पोलीस निरीक्षक कोडुभैरी यांच्यासह दिपक कांदळकर यांचा मित्र परिवार वेण्णालेक येथे तळ ठोकुन होते. आत्महत्येच्या पाठीमागचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.