मालेगावमध्ये भीषण आग! अनेक यंत्रमाग कारखाने आगीत जळून खाक

Fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मालेगाव : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांआधीच आगीची आणखी एक घटना समोर आली होती. यात एका फर्निचर मॉलसह भंगार गोदामाला आग लागली होती. आग लागली त्यावेळी फर्निचर मॉलमध्ये आठ ते दहा कामगार झोपलेले होते. मात्र, त्यांना वेळीच जाग आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या आगीतही लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. हि घटना ताजी असताना आज आणखी एक आगीची घटना समोर आली आहे.

आता नाशिकच्या मालेगावमधील द्याने शिवारात एक मोठी दुर्घटना घडली. यात अनेक यंत्रमाग कारखान्यांना आग लागल्याने भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ही घटना नाशिकच्या वडनेर-पाथर्डी रोडवर घडली होती. या आगीच्या घटनेत संपूर्ण मॉलसह भंगार गोदाम जळून खाक झाले. तर, आजच्या घटनेतही लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचे समजत आहे. पहाटे लागलेली ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी