नवी दिल्ली । अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन (Richard Branson) यांनी केलेल्या व्हर्जिन हायपरलूपची (Virgin Hyperloop) पहिली मानवी चाचणी पूर्ण झाली आहे. रविवारी पहिल्यांदाच दोन मानवांनी या हायपरलूपमध्ये 160 किमी प्रति तासाच्या वेगाने प्रवास केला. याद्वारे, व्हर्जिन हायपरलूप या तंत्रज्ञानाची चाचणी करणारी जगातील एकमेव कंपनी बनली आहे. या चाचणीत भाग घेतलेल्या दोन लोकांपैकी कंपनीचे सीटीओ जोश गिगेल (Josh Geigel) आणि पॅसेंजर एक्सपीरियन्स डायरेक्टर सारा लुचियान (Sara Luchian) आहेत.
ही चाचणी 400 मानवरहित चाचणीनंतर घेण्यात आली
या हायपरलूपची चाचणी अमेरिकेच्या नेवाडा (Nevada, USA) प्रांतातील व्हर्जिन हायपरलूपच्या डेव्हलप टेस्ट ट्रॅकवर (DevLoop Test Track) झाली. ते 5 मीटर लांब आणि 3.3 मीटर रूंदीचे आहे. या चाचणीपूर्वी या कंपनीने या ट्रॅकवर 400 हून अधिक चाचण्या केल्या असल्याचा कंपनीचा दावा आहे. यानंतर मानवांसाठी ही चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या चाचणीसाठी दोन्ही मानवांना एका पॉड मध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर हा पॉड ट्रॅकवर आणला गेला. त्याचा वेग ताशी 160 किलोमीटर नोंदविण्यात आला. हे पॉड 28-सीटर एक्सपी -2 पेगाससचे (XP-2 Pegasus) एक छोटे व्हर्जन आहे. भविष्यात ही कंपनी स्वतःच ते बाजारात आणण्याची योजना आखत आहे.
हायपरलूप म्हणजे काय?
हायपरलूप ही ट्रांसपोर्टेशनची एक नवीन पद्धत आहे. असा विश्वास आहे की, आतापर्यंतच्या ट्रांसपोर्टेशनच्या सर्व पद्धतीमध्ये हि सर्वात वेगवान असेल. या तंत्राची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा पर्यावरणावरही परिणाम होणार नाही. व्हर्जिन हायपरलूप याआधी 2014 मध्ये सादर केला गेला होता.
एलोन मस्कच्या ‘अल्फा पेपर’ मध्ये त्यास पाचवा ट्रांसपोर्टेशन मोड (5th Mode of Transportation) असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे मानव आणि कार्गो या दोन्हीच्या ट्रांसपोर्टेशनची तयारी आहे. असा विश्वास आहे की, सन 2040 पर्यंत संपूर्ण जगात कार, ट्रक आणि विमानांची संख्या दुप्पट होईल. अशातच, हे तंत्र खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होऊ शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.