नालासोपाऱ्यात वकिलाने भरधाव दुचाकी महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली

man tried to kill woman traffic police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – वाहतूक पोलिसांना त्रास देण्याचे प्रकरण अनेक वेळा समोर आले आहेत. त्या संदर्भातील अनेक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या नालासोपारा या ठिकाणी घडला आहे. या घटनेत महिला वाहतूक पोलिसाच्या चक्क अंगावर भरधाव वेगात दुचाकी (man tried to kill woman traffic police) घातल्याची घटना समोर आली आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो एक व्यक्ती दुचाकी घेऊन गेटच्या बाहेर पडत आहे. त्या व्यक्तीला महिला पोलीस अडवण्याचा प्रयत्न करते मात्र ती व्यक्ती त्या महिला पोलिसाच्या अंगावरूनच गाडी भरधाव (man tried to kill woman traffic police) वेगाने बाहेर नेते. इतक्यात इतर पोलिस अधिकारी त्याला थांबवत ताब्यात घेतात मात्र तो शिवीगाळ करत बाजूला होताना दिसत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरोपी हे वकील असून ब्रजेशकुमार भैलोरीया असे त्यांचे नाव आहे. ब्रजेशकुमार भैलोरीया यांची दुचाकी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महिला पोलीस प्रज्ञा दळवी यांनी त्यांच्या दुचाकीला गोडाऊन मध्ये आणले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून सरकारी कामात अडथळा निर्माण करत वकिलांनी हा संपूर्ण प्रकार घडवून (man tried to kill woman traffic police) आणला. या प्रकरणानंतर महिला पोलिसाला उजव्या हाताला आणि डाव्या पायाला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यानंतर प्रज्ञा यांनी वकील ब्रजेशकुमार आणि त्यांची पत्नी डॉली यांच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा नोंदवला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दांपत्याला अटक केली आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय