हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रकाश जावडेकर म्हणजे पुण्याचेचं ना. मग श्लोक पठण हा तर त्यांच्या नित्य कर्माचा भाग झाला म्हणून त्यांनी मंत्रोच्चारण केले तर त्यात बातमी काय आहे, असा प्रश्र्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल ना ! तर थोडं थांबा. जावडेकरांनी मंत्रोच्चारण केले ते घरी केलें नाही किंवा कुठल्या पूजेच्या प्रसंगी केले नाही तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत केले आहे.
सध्या संयुक्त राष्ट्र संघाची सुरक्षा परिषदेची बैठक सुरू आहे. या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पहिल्यांदा देववाणी संस्कृत चा श्लोक घुमला. तो श्लोक असा होता.”द्यौ: शांतिरंतरिक्षं शान्ति : पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय : शान्ति :।। वनस्पतय: शांतिविश्वे देवा: शांतिर्ब्रह्मा शांति: सर्वं शांति:, शांतिरेव शांति: सा मा शांतिरेधि ।। ú शांति: शांति: शांति:।।
या श्लोकांने जावड़ेकरांनी भाषणाला सुरवात केली त्यानंतर त्यांनी निसर्गाच्या महत्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की सध्या अशी कोणतीही पद्धत नाही ज्या माध्यमातून जलवायु परिवर्तन आणि संघर्ष यांच आकलन होईल. त्यामुळे जलवायु परिवर्तनासाठी सर्व देशांना एकत्र येत आपले कर्तव्य पूर्ण करावे लागेलं. तसेच येणारा काळ हा मानवजातीसाठी खूप संघर्षाचा काळ असेल. म्हणून येत्या काळात मानवाच्या विकासासाठी नैसर्गिक संपत्ती टिकवायची असेल तर आज पासूनच कामाला लागले पाहिजे. या कामी भारताचा नेहमीच पुढाकार असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.