नवी दिल्ली । मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व इतर शासकीय कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या असंतोषामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकी दरम्यान फडणवीस यांची नरेंन्द्र मोदीं समवेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणामुळे राज्य सरकार वर खूप दबाव असल्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा झाली असावी, ह्या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. राज्यात सध्या पेटलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीस मोदींना भेटले असल्याचे बोलले जात आहे.
मात्र या बैठकीत नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीस आणि नरेंन्द्र मोदी यांच्यात चर्चा झाली असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांची विशेष बैठक दिल्ली येथे बोलावली असल्याचेही सुत्रांकडून समजत आहे. आरक्षणाची मागणी घेऊन मराठा समाज लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करत अाहे. हे आंदोलन भाजप सरकारणे गांभीर्याने घेतले असून दिल्लीत यावर गलबते होत आहेत. पंतप्रधानांना भेटून महाराष्ट्रातील विविध प्रश्नांबाबत त्यांना माहीती दिल्याचे फडणवीस यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे.
Called on Hon PM @narendramodi ji in New Delhi this evening to apprise him on the various issues of Maharashtra.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची आज सायंकाळी नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांबाबत त्यांना माहिती दिली. pic.twitter.com/ubArAfPHDc— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 6, 2018
https://platform.twitter.com/widgets.js