मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी |  मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील हे महाराष्ट्रात चांगलेच परिचित झाले आहेत. त्यांना आता राजकारणाचे देखील वेध लागले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदाराची निवडणूक आगामी काळात पार पडणार आहे त्या आमदारकीसाठी शिवसेना विनोद पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर येते आहे.

एका मराठी न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेसाठी विनोद पाटील यांना शिवसेना उमेदवारी देऊ इच्छिते. त्याच प्रमाणे विनोद पाटील यांच्या समवेत अर्जुन खोतकर, राजू वैद्य , नरेंद्र वैद्य त्यांची नवे सुद्धा या जागेसाठी चर्चेत आहेत. त्यामुळे या जागेवर कुणाची वर्णी लागणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाला मुका मोर्चा संबोधून शिवसेनेने मराठा समाजाची नाराजी ओढवून घेतली होती. त्या नाराजीचा सामना आगामी निवडणुकीत करावा लागू नये म्हणून शिवसेना हे अस्त्र उपसते आहे असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता विनोद पाटील राजकारणात येणार का? आले तर ते शिवसेनेतून येणार का? याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

हे पण वाचा –

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!

म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो

ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट