मुंबई । मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री व्हावी, तसं होणार असेल, तर त्याला माझं समर्थन असं विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शेलार यांनी हे विधान केल्यानं याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत असताना शेलार यांनी केलेल्या विधानानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलारांनी मराठा समाजातल्या स्त्रियांच्या कर्तृत्त्वावर भाष्य केलं. ‘मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती फार कमी असतात. ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकात शरद पवारांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल जे लिहिलंय, ते अतिशय प्रेरणादायी आहे. मराठा समाजातली कर्तृत्ववान स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं मला वाटतं. तसं होणार असेल, तर त्याला माझं समर्थन आहे,’ असं शेलार म्हणाले.
आशिष शेलार यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेलार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अनेकांनी शेलार यांच्या विधानाचा संदर्भ भाजपमध्ये सुरू असलेल्या ताज्या घडामोडींशी जोडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. या निवडणुकीच्या प्रभारीपदी आमदार अतुल भातखळकर यांची नेमणूक करण्यात आली. या बैठकीला शेलार अनुपस्थित होते.
100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम, पण आधी….' – नितीन राऊतांचा खुलासा
वाचा सविस्तर-👉 https://t.co/6oEVWBEGIL@NitinRaut_INC #HelloMaharashtra #bill #lightbill— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 20, 2020
'महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर महागात पडेल! तेव्हा..' राजेश टोपेंचा राज्यातील जनतेला गंभीर इशारा
वाचा सविस्तर-👉 https://t.co/Y5iXJIIpiG@rajeshtope11 #corona #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 20, 2020
फडणवीस उठाबशा काढत असतील तर आम्ही त्यांना चितपट करू! जयंत पाटलांचे थेट आव्हान
वाचा सविस्तर-👉 https://t.co/mkFRwtH88x@Jayant_R_Patil @Dev_Fadnavis @NCPspeaks @BJP4Maharashtra #Mumbai #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 20, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in