हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासांत कापता येणार आहे. यावरून आता टोलेबाजी होऊ लागली आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून ‘आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय…गेली 12 वर्षे’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
समृद्धी महामार्गावरून अभिजीत केळकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून “आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय…गेली 12 वर्षे’ अशी पोस्ट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्याने समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाबद्दल स्टेफी व्यक्त केला आहे. त्याने रागावल्याचे इमोजी शेअर केली आहेत. अभिजीत हा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो.
https://www.instagram.com/p/CmA4M1YqlSQ/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
दरम्यान आज समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर अभिजीतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत परखडपणे मत मांडले आहे. 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक 8311 हेक्टर जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया अवद्या आठ महिन्यात पार पडली. समृध्दी महामार्गाचा डिझाइन स्पीड 150 कि.मी. / प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून 100 कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर नागपूरहून मुंबईपर्यंत यायला अवघे सहा ते आठ तास लागतील.