हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1,33,746.87 कोटी रुपयांची वाढ झाली. या कालावधीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस या कंपन्यांचा सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सच्या सेन्सेक्स मध्ये 989.81 अंकांनी वा 1.68 टक्क्यांनी वाढ झाली.
समीक्षाधीन आठवड्यात TCS च्या मार्केटकॅपमध्ये 32,071.59 कोटी रुपयांनी वाढ होऊन 11,77,226.60 कोटी रुपये झाली. त्याच वेळी, रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप 26,249.1 कोटी रुपयांनी वाढून 17,37,717.68 कोटी रुपयांवर पोहोचली. इन्फोसिसची मार्केटकॅप 24,804.5 कोटी रुपयांनी वाढून 6,36,143.85 कोटी रुपये तर ICICI बँकेची मार्केटकॅप 20,471.04 कोटी रुपयांनी वाढून 6,27,823.56 कोटी रुपये झाली. Stock Market
‘या’ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही झाली वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केटकॅप 15,171.84 कोटी रुपयांनी वाढून 4,93,932.64 कोटी रुपये झाली. त्याच वेळी, अदानी ट्रान्समिशनची मार्केटकॅप 7,730.36 कोटी रुपयांनी वाढून 4,38,572.68 कोटी रुपयांवर पोहोचली. तसेच HDFC बँकेची मार्केटकॅप 7,248.44 कोटी रुपयांनी वाढून 8,33,854.18 कोटी रुपये झाली. Stock Market
‘या’ कंपन्यांच्या मार्केटकॅपमध्ये झाली घसरण
याउलट, हिंदुस्थान युनिलिव्हरची मार्केटकॅप 3,618.37 कोटी रुपयांनी घसरून 6,08,074.22 कोटी रुपये झाली तर एचडीएफसीची मार्केटकॅप 2,551.25 कोटी रुपयांनी घसरून 4,41,501.59 कोटी रुपये झाली. बजाज फायनान्सची मार्केटकॅप 432.88 कोटी रुपयांनी घसरून 4,34,913.12 कोटी रुपये झाली. Stock Market
रिलायन्स पहिल्या स्थानावर
सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एचडीएफसी, अदानी ट्रान्समिशन आणि बजाज फायनान्सचा क्रमांक लागतो. Stock Market
BSE वर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅप सर्वोच्च पातळीवर
शेअर बाजारात नुकत्याच आलेल्या तेजीमुळे BSE ने नवीन उच्चांक गाठला आहे. यावेळी BSE वरील लिस्टेड कंपन्यांची एकूण मार्केट कॅप 283 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. BSE वर लिस्टेड कंपन्यांची मार्केटकॅप सध्या 2,83,03,925.62 कोटी रुपये झाली आहे. गेल्या 2 दिवसांत BSE ने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये 2,16,603.93 कोटी रुपयांची वाढ केली आहे. Stock Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/
हे पण वाचा :
Investment : ‘या’ 5 लहान बचत योजनांमध्ये गुंतवणुक करून टॅक्स सूटसोबतच मिळवा चांगले रिटर्न
Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती !!!
अमेरिकेतून नवीन iPhone 14 खरेदी करण्याचे फायदे अन् तोटे जाणून घ्या
ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न
‘या’ Multibagger Stock मध्ये फक्त 15 हजार रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदार बनले करोडपती !!!