पंढरपूर प्रतिनिधी | कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १६७ वर पोहोचला आहे. कोरोनाचा अनेक गोष्टीवर परिणाम पडत आहे. पंढरपुरातील सांगोल्यात पै पाहुण्यांची गर्दी टाळून साध्या पध्दतीने घरीच केला विवाहसोहळा पार पाडल्याचे समजत आहे.
सांगोला येथील वैभव इंगोले या तरूणाचा आज विवाह सोहळा नियोजित होता. विवाह सोहळयासाठी मंगल कार्यालयासह सर्व जय्यत तयारी केली होती. लग्नासाठी पै पाहुणे देखील जमली होती. लग्नघरी कुरवल्यांची गर्दी ही झाली होती. लग्नाला अवघे काही तास शिल्लक असतानाच जिल्हा प्रशासनाने मंगल कार्यालयात विवाह सोहळा साजरा न करता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साधे पध्दतीने विवाह सोहळा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज दुपारी 12.30 वाजता कोणता ही डामडौल न करता अगदी मोजक्या लोकाच्या साक्षीने वैभव आणि ॠतुजा यांची रेश्मी गाठ बांधली. साध्या पध्दतीने विवाह सोहळा साजरा केल्याने इंगोले परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळून विवाह सोहळे साजरे करण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगोला येथील इंगोले परिवाराने साध्या पध्दतीने मोजक्या लोकांमध्ये विवाह सोहळा साजरा केला होता.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –
मोठी बातमी! तब्बल ४५१ भारतीयांना झाली आहे कोरोनाची लागण, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली
करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड
कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद
दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी
राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग