Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुतीचा डबल धमाका; Alto K10 CNG मध्ये लॉन्च

Maruti Suzuki Alto K10 CNG
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या (Maruti Suzuki Alto K10 CNG) वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल CNG वाहनांकडे वळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुजूकीने आपली Alto K10 CNG व्हर्जन मध्ये लॉन्च केली आहे. ही कार फक्त एकाच VXi व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीची किंमत 5.94 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

गाडीचे इंजिन – 

मारुती सुजूकीने नुकतीच Alto K10 लॉन्च केली होती. या कारला ग्राहकांकडून (Maruti Suzuki Alto K10 CNG) चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यातच आता अल्टो K10 चे CNG व्हेरिएन्ट लॉन्च झाल्यांनतर या गाड्यांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने नव्या Alto K10 CNG मध्ये कंपनी फिट केलेले CNG किट जोडण्याव्यतिरिक्त कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. या कारमध्ये कंपनीने 1.0 लिटर क्षमतेचे K10c डुअलजेट इंजिन VVT इंजिन वापरले आहे. पेट्रोल मोडमध्ये हे इंजिन 65 bhp पॉवरआणि 89 Nm टॉर्क जनरेट करते, तर CNG मोडमध्ये 55 bhp पॉवर आणि 82 Nm टॉर्क जनरेट करते.

Maruti Suzuki Alto K10 CNG

फीचर्स – (Maruti Suzuki Alto K10 CNG)

स्टँडर्ड VXi पेट्रोल व्हेरियंट प्रमाणे, (Maruti Suzuki Alto K10 CNG) मारुतीच्या या CNG कारमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 2-DIN स्मार्टप्ले ऑडिओ सिस्टम, 2 स्पीकर, इम्पॅक्ट सेन्सिंग डोअर अनलॉक, सेंट्रल लॉकिंग, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, मॅन्युअली अॅडजस्टेबल विंग मिरर, AUX आणि USB पोर्ट्स, यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Maruti Suzuki Alto K10 CNG

 

33.85 kmpl मायलेज –

मारुती अल्टो K10 CNG सुमारे 33.85 kmpl चा मायलेज देईल असा दावा (Maruti Suzuki Alto K10 CNG) कंपनीने केला आहे . कंपनीच्या मते, गाडीचे स्टॅंडर्ड पेट्रोल व्हर्जन मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह अनुक्रमे २४.३९ किमी/ली आणि २४.९० किमी/ली मायलेज देते. Alto K10 CNG लाँच केल्यावर,आता मारुती सुजूकीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये एकूण 13 S-CNG मॉडेल्स आहेत.

Maruti Suzuki Alto K10 CNG

 

किंमत-

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, मारुतीच्या या CNG मॉडेल्सची किंमत 5.94 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सीएनजी व्हेरियंटची किंमत नियमित पेट्रोल मॉडेलपेक्षा जवळपास 1 लाख रुपये जास्त आहे.

हे पण वाचा :

Maruti CNG Cars : Maruti ची CNG कार घेताय? पहा सर्व गाड्यांच्या किंमती अन् मायलेज

Toyota Glanza CNG कार लॉन्च ; 31 किमी मायलेज

Honda Car : Honda च्या या गाड्यांवर 63,000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या फायदा

Cheapest Electric Car : सर्वात स्वस्त Electric Car लॉन्च; 2 हजार रुपयांत करा बुक