1 लिटर पेट्रोलमध्ये 40Km धावणार! Maruti Swift आणि Dzire हायब्रिड इंजिनसह लवकर होणार लाँच

Maruti Dzire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मारुती सुझुकीच्या (Swift) आणि (Dzire) या दोन्ही कार त्यांच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. अलीकडेच कंपनीने त्यांचे अपडेट व्हर्जन मार्केटमध्ये आणले होते. यानंतर आता कंपनी या दोन्ही कारच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलवर काम करत आहे, ज्यात स्ट्राँग हायब्रिड पेट्रोल इंजिनसह या कार लॉन्च करण्यात येणार आहे. या बदलाचा परिणाम या गाड्यांच्या मायलेजवर होणार आहे. या गाड्या 35 ते 40 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देऊ शकतील.

ऑटोकारने दिलेल्या अहवालानुसार, मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Swift) आणि डिझायर (Maruti Suzuki Dzire) या दोन्ही गाड्यांचे पुढील व्हर्जन 2024 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत लॉन्च केले जाऊ शकते. या गाड्यांमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरण्यात येणार आहे. तसेच हे इंजिन टोयोटाच्या स्ट्राँग हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल, जे नुकतेच मारुती ग्रँड विटारामध्ये वापरण्यात आले होते. टोयोटा आणि मारुती सुझुकी दोन्ही त्यांच्या Hyryder आणि Grand Vitara मध्ये मजबूत हायब्रिड सिस्टम वापरतात.

मारुती सुझुकी स्विफ्ट ही देशातील सर्वात इंधन कार्यक्षम कार असेल
अहवालानुसार, मारुती स्विफ्ट आणि डिझायरचे नवीन व्हर्जन बाजारात आल्यानंतर या देशातील सर्वात इंधन कार्यक्षम कार असतील.या कार 35 ते 40 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देऊ शकतात असे अहवालामध्ये सांगण्यात आले आहे. या दोन्ही कारचे (Maruti Swift) सध्याचे मॉडेल अनुक्रमे 22.56 kmpl आणि 24.1 kmpl पर्यंत मायलेज देतात. दुसरीकडे, ग्रँड विटाराचे स्ट्राँग हायब्रिड 27.97 kmpl पर्यंत मायलेज देते. दोन्ही गाड्यांना सध्या खूप मागणी आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये, कंपनीने स्विफ्टच्या एकूण 17,231 युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात विकल्या गेलेल्या 9,180 युनिट्सपेक्षा 88% जास्त होती. यासह ऑक्टोबर महिन्यात अल्टो आणि वॅगनआर नंतर देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?