मुंबई | माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, तसेच बस, रेल्वेत कामागारांना प्रवेश मिळावा तसेच कामगारांना 50 लाख रूपयांचे संरक्षण मिळावे. या मागण्यासाठी उद्या (दि. 24) शनिवारी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार संप करणार असल्याचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
उद्या शनिवारी माथाडी कामगार संप का करणार आहेत, याविषयी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, माथाडी कामगारांच्या प्रत्येक घटकाला अत्यावश्यक सेवेत घ्यावे. तसेच रेल्वे, बसमध्ये प्रवास करण्याची परवानगी द्यावी. आतापर्यंत 50 कामगारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तेव्हा कामगारांना 50 लाखांचे विमा संरक्षण मिळावे. राज्य सरकारकडे सातत्याने मागण्या मांडल्या जात आहेत, मात्र त्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी संप केला जाणार आहे.
माथाडी व मापाडी कामगारांना सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये रोखले होते. मुख्यमंत्री प्रवासांची सूचना दिली नाही. मुख्यमंत्र्यांनी विषय गांभीर्याने घ्यावा अन्यथा नवी मुंबईचे एफएमसी मार्केट सुरू होणार नाही, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group