मायकेल वॉनने इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंविषयी उपस्थित केले प्रश्न, म्हणाला -“त्यांना आयपीएलमध्ये खेळायची परवानगी कशी मिळाली?”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा जगातील सर्वात मोठ्या वार्षिक क्रिकेट महोत्सवासारखा आहे, परंतु यावेळी कोविड -19 मुळे संपूर्ण देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून ही टी -20 लीग देशात खेळण्याची परवानगी मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला (Michael Vaughan) असे वाटते कि सध्या ही टी -20 लीग चालू ठेवावी, कारण कोट्यावधी लोकांना यामुळे आनंद होतो. पण यासह आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या 14 व्या मोसमातील एका गोष्टीने वॉनला आश्चर्यचकित केले आहे.

दररोज साडेतीन लाखांहून अधिक कोरोनाव्हायरसची (Coronavirus) प्रकरणे भारतात समोर येत आहेत. देशभरातील बहुतेक भागात कडक निर्बंध आणि कर्फ्यू लागू करण्यात आले आहेत. कोविड -19 संक्रमित रुग्णांची संख्या आणि त्यांच्यावरील उपचार हे आरोग्य क्षेत्रासाठी एक मोठे आव्हान बनले आहे. तथापि, अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी क्रिकेटपटूंची धास्ती समजण्यासारखी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या विषाणूपासून खेळाडूंना सुरक्षित ठेवण्यासाठी बायो बबलची व्यवस्था केली आहे. आयपीएलचे 14 वे सत्र सुरूवातीपासूनच सुरळीत सुरू झाले होते, परंतु कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अ‍ॅडम झॅम्पा, केन रिचर्डसन, अँड्रेयू टाय आणि लियाम लिव्हिंगस्टोन सारख्या काही खेळाडूंनी या लीगमधून माघार घेण्याचे ठरविले. ज्यामुळे या स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तथापि, लीगचे उर्वरित सर्व विदेशी खेळाडू त्यांच्या वचनबद्धतेमुळे थांबले आहेत. अशा परिस्थितीत मायकेल वॉनने आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू खेळत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. वॉनने ट्वीट करून लिहिले की, “मला वाटते की, आयपीएल सुरूच राहायला पाहिजे. या भयावह काळात, दररोज संध्याकाळी मिळणार हा मूल्यवान असा आनंद महत्त्वाचा आहे…. पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावरून स्वतः माघार कशी घेतली याची कल्पना करणे मला कठीण झाले आहे. पण आतापर्यंत या दोन्ही देशांच्या खेळाडूंना भारतात खेळण्याची मात्र परवानगी मिळाली आहे !!! ”

हे लक्षात घ्या की, इंग्लंडच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका दौरा मध्येच सोडून दिला होता. वास्तविक, त्यावेळी दोन्ही संघांच्या कॅम्प मधील हॉटेल कर्मचार्‍यांमध्ये कोरोना विषाणू सापडल्यानंतर इंग्लंडने हा निर्णय घेतला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) दक्षिण आफ्रिकेचा बायो बबल फोडून आपल्या खेळाडूंना परत बोलावण्याचा निर्णय घेतला होता, कारण व्हायरसचा धोका रोखण्यासाठी ते पुरेसे नव्हते.

ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार होता, परंतु दक्षिण आफ्रिकेमधील व्हायरसच्या जोखमीचे कारण सांगून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संपूर्ण आफ्रिकन दौर्‍यावरून माघार घेतली. कोरोना विषाणूमुळे आज देश आणि जगाच्या इतर भागात हाहाकार माजला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment