हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मुद्यांवर चर्चा केली. मात्र, सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत पंतप्रधान मोदींशी त्यांनी चर्चा केली नाही. यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांच्याबद्दल मोदींशी चर्चा का केली नाही? त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.
इम्तियाज जलील यांनी आज त्यांच्या ट्विट अकाऊंटवरून ट्विट करीत पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये “तुमचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक होऊन तुरुंगात असताना तुम्ही पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखवली नाही?,” असा सवाल जलील यांनी केला आहे.
तुमचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक होऊन तुरुंगात असताना तुम्ही पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखवली नाही? https://t.co/VnOAkRJP7h
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) April 6, 2022
काल शरद पवार यांनी जेव्हा नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत चर्चा केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बढे नेते अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्याबाबत काहीच विषयांवर पवारांनी चर्चा केली नाही. त्यामुळे यावरून विरोधकांकडून आता पवारांवर निशाणा साधला जाऊ लागला आहे.