मंत्री हसन मुश्रीफ यांच्या थोरल्या बहीण हिबजाबी मुजावर यांचे निधन

hibjabi Mujavar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची थोरल्या बहीण श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या थोरल्या बहिणीच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची दुसरी लाट हि पहिल्या लाटेपेक्षा खूपच भयंकर आहे. कृपया कुणीही सांत्वनासाठी येऊ नये. कडक लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाची भीती आहे. अतिआवश्यक काम असेल तर फोनवरून बोलावे. व लॉकडाऊन उठल्यानंतर भेटूया. घरी रहा, सुरक्षित रहा. कोरोनाची लक्षणे आढळल्यास विनाविलंब तपासणी करुन घ्यावी आणि पुढील उपचारासाठी माझी मदत घ्यावी, अशी विनंती मंत्री मुश्रीफ यांनी लोकांना केली आहे.

मृत हिबजाबी मुजावर यांच्या माघारी नातू, सून, ३ मुली असा परिवार आहे. या कोरोनाच्या संकटात मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ बहिण, लहान बहिणीचे पति,भाचीचा पती, मामाचा मुलगा यांना गमावले आहे.