समीर दाऊद वानखेडेचा फर्जीवाडा इथूनच सुरु होतो; फोटो ट्विट करत मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले आहे. वानखेडे यांच्या विरोधात अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले आहेत. त्यांनीआज एक खळबळजनक आरोप केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी यापूर्वीही समीर वानखेडे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांनी आज आणखीन एक नवीन आरोप करीत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाबाबतचा खुलासाच केला आहे. मलिक यांनी वानखेडे यांचे पहिले नाव हे समीर दाऊद वानखेडे असे असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

मलिक यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेचा एक कागद पोस्ट केला आहे. तो कागद नेमका कशा संबंधातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, हा कागद पोस्ट करताना मलिक यांनी त्यावर समीर दाऊद वानखेडे यांच्या फर्जीवाडा इथूनच सुरू झाला असं म्हटलं आहे.

दरम्यान आर्यन खान ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करणारा व्हिडीओ समोर आला आहे. के.पी गोसावीचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याचा हा व्हिडिओ आहे. ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील जवळपास फायनल झाली होती. शाहरूख खानच्या मॅनेजरसोबत मिटिंग देखील झाली होती. त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना दिले जाणार होते, असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे.

 

 

समीर वानखेडे यांनी याबाबत आरोप फेटाळले आहेत. आपल्याला खोट्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. अज्ञात व्यक्तींकडून कायदेशीर कारवाईचा खटाटोप असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment