Sunday, May 28, 2023

महाराजांचं नाव वापरण्याची शिवसेनेची लायकी नाही; संभाजीराजेंच्या माघारीनंतर मनसेची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही यावेळी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता मनसेकडून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आलेला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत “उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत, अशी टीका केली आहे.

संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना नेते गजानन काळे यांनी ट्विट केले असून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत, अशी कळले यांनी म्हंटले आहे.

यावेळी काळे यांनी आणखी एक ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. “चोरसेना आता खोटीसेना म्हणून प्रसिद्ध होण्याच्या बेतात. भावाबद्दल कूटनिती करणाऱ्यांकडून राजेंना फसवले म्हणून काय आश्चर्य वाटून घ्यायचे? महाराष्ट्र आणि मराठा समाजाने ही जखम विसरता कामा नये. हिम्मत असेल तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ येवून सांगा की आम्ही राजेना शब्द दिला नव्हता, असे आव्हान कळले यांनी दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मात्र, दिलेला शब्द पाळला नाही : संभाजीराजे

यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अपक्ष म्हणून मी राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महा विकास अगदी पुरस्कृत अपक्ष म्हणून मला पाठींबा द्यावा अशी मी मागणी केली होती. मात्र, त्यांनी मला उमेदवारी न देता आमचे प्रिय मित्र, संजय पवार यांना उमेदवारी जायीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत विचारणा केली. पण मुख्यमंत्र्यांनी माझा फोन घेतला नाही. ज्या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांसोबत माझ्या बैठका झाल्या, त्यांच्याकडेही माझ्या या प्रश्नाचे उत्तर नव्हते. मुख्मयंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशा शब्दात संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.