हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणुक होत आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये तसेच एमआयएमचा पाठींबा मिळावा यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आज सपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी हे मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. यावरून मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “अबू आझमी मुख्यमंत्र्याच्या भेटीला जाणार आहे. ते आता अबू आझमीसोबत आता मातोश्रीवर बसून बिर्याणीचा आस्वाद घेणार?,” असा सवाल काळे यांनी केला आहे.
मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत निशाणा साधण्यात आला आहे. त्यांनाही ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “कायम हिंदू, हिंदुत्वाबद्दल गरळ ओकणारा समाजवादी पक्षाचा अबू आझमी हा चक्क मुख्यमंत्र्यांच्या भेटीला … आता काय… मातोश्रीवर बसून बिर्याणीचा आस्वाद घेणार … ? धन्य ते… ढोंगी हिंदुत्व …!!! हे यांचे धर्म आणि मर्म …!!!, अशी टीका काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
कायम हिंदू, हिंदुत्वाबद्दल गरळ ओकणारा समाजवादी पक्षाचा अबू आझमी हा चक्क मुख्यमंत्र्यांच्या भेटीला …
आता काय… मातोश्रीवर बसून बिर्याणीचा आस्वाद घेणार … ?
धन्य ते… ढोंगी हिंदुत्व …!!! हे यांचे धर्म आणि मर्म …!!!— Gajanan Kale (@MeGajananKale) June 8, 2022
मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीला अबू आझमी गैरहजर होते. त्यामुळे यातून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार अर्थात खुद्द अबू आझमी आणि रईस शेख हे कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार? यावर चर्चा सुरू झाली होती. अबू आझमींनी आपल्या मागण्यांसंदर्भाती एक पत्र देखील मुख्यमंत्र्यांना पाठवले. त्यानंतर आज अबू आझमी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाणार आहेत.