हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्या बाबत केलेल्या वक्तव्याचा विरोध केल्यानंतर अखेर आज मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली. पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आले आहे
वसंत मोरे यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासोबतीचा फोटो ट्विट केला आहे. त्यात वसंत मोरे मावळ्याच्या वेशात आहेत तर साईनाथ बाबर महाराजांच्या वेशात आहेत. “अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे” असं म्हणत साईनाथ बाबर यांचं वसंत मोरेंनी अभिनंदन केलं आहे. या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे
"अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड!
खूप खूप अभिनंदन साई!@Sainathbabar7 pic.twitter.com/Qkar8mCakS— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 7, 2022
मनसे सोडून जाणार नाही- वसंत मोरे
दरम्यान, शहराध्यक्ष पदा वरून मला हटवण्यात आले असले तरी माझं मनसे सैनिक पद गेलेलं नाही असे वसंत मोरे यांनी म्हंटल एका वृत्तवाहिनीशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, मी राज ठाकरे यांच्याकडून अकरा महिन्यांसाठीच शहरध्यक्षपद मागून घेतले होते. साईनाथ बाबर हे माझेच मित्र आहेत. मी नाराज नाही. गेली 25 वर्षे मी राज साहेबांसोबत काम करत आहे. माझ्याशी अन्य पक्षांच्या लोकांनी संपर्क साधला आहे मात्र मी मनसे सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. .