हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेड्यात राहणाऱ्या लोकांना आता यापुढे विजेचे बल्ब खरेदी करण्यात कोणताही त्रास होणार नाही. इंडियाची एनर्जी एफिशिएंट सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) सुमारे 60 कोटी बल्ब ग्रामीण भागात प्रती बल्ब 10 रुपये दराने देण्याची योजना आखत आहे. तुम्हाला 10 रुपयांमध्ये 70 रुपयांचा बल्ब कसा मिळेल ते जाणून घेउयात..
ही योजना कोणत्याही अनुदाना किंवा शासकीय मदतीशिवाय करण्याची योजना आहे. EESLचे हे पाऊल मेक इन इंडियाला तसेच भारताच्या हवामान बदलाच्या धोरणाला पुढे आणण्यासाठी चालना देणारी मानली जाते. यासह उजाला या योजनेलाही चालना देणारी मानली जाते आहे.
आता 70 रुपयांचा बल्ब मिळणार 10 रुपयांना : EESL सध्या जगातील सर्वात मोठा असा लाइटिंग प्रोग्राम चालवित आहे. सरकारच्या उजाला योजनेंतर्गत 2014 मध्ये 310 रुपयांमध्ये विकला गेलेला एलईडी बल्ब आता 70 रुपयांवर आला आहे. मात्र आता गावातील लोक या बल्बसाठी 10 रुपये देतील आणि उर्वरित 60 रुपये कार्बन क्रेडिटमधून मिळणाऱ्या रेवेन्यू द्वारे दिले जातील. सरकार संयुक्त राष्ट्रांच्या स्वच्छ विकास यंत्रणा (सीडीएम) अंतर्गत उजाला ही योजना चालू आहे, ज्यामध्ये कार्बन क्रेडिट्सचा क्लेम करण्याचा फायदा दिला जातो.
EESL चे हे पाऊल महत्त्वाचे आहे कारण ग्रामीण उजाला योजनेंतर्गत 36 कोटी एलईडी बल्बपैकी केवळ पाच टक्के किंवा सुमारे 18 टक्केच एलईडी बल्ब हे ग्रामीण भागात वितरीत केले जातात. ग्रामीण उर्जा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील वीज प्रवेशासही प्रोत्साहन दिले जाईल. कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याची तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत EESL चे हे पाऊल बर्याच कंपन्यांना आकर्षित करणारे ठरेल.
1 कोटी बल्ब पासून सुरूवात होणार: या योजनेंतर्गत 1 कोटी एलईडी बल्ब देण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यापैकी 600 कोटी रुपये ग्रामीण ग्राहकांकडून मिळतील आणि उर्वरित रक्कम कार्बन क्रेडिटच्या रेवेन्यूतून पूर्ण होईल. तसेच, हे सर्व बल्ब टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. EESL च्या मते, भारत सध्या एलईडी बल्बसाठी जगातील दुसर्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. उजाला योजना ही ग्रामीण भागातील वीजपुरवठा देखील सुनिश्चित करेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.