हॅलो महाराष्ट्र । तुषार (काल्पनिक नाव) दिल्ली येथे राहतो. त्याचा पगार एक दिवस अगोदर आला होता. आता पगारानंतर तो वीज बिल भरण्यासाठी देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएम वापरतो. अमितसाचे ट्रान्सझॅक्शन फेल झाले, मात्र त्याच्या डेबिट कार्डमधून पैसे कट करण्यात आले. ही गोष्ट फक्त तुषारची नाही तर तुमचीही असू शकते. तुमच्या डेबिट / क्रेडिट कार्डमधील बॅलन्स कट झाला असा मेसेज जर तुम्हांला मिळाला असेल तर काळजी करू नका. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न पडतो.
असे का होते?
1. जेव्हा पेटीएम किंवा कोणत्याही ई-वॉलेटला आपल्या बँकेकडून किंवा पेमेंट गेटवेकडून फायलन कंफर्मेशन मिळत नाही, तोपर्यंत ट्रान्सझॅक्शन पेडिंग राहतो. काही तासांनंतर ही कंफर्मेशन मिळाले नाही तर ट्रान्सझॅक्शन फेल होतो.
2. पेमेंट गेटवेमध्ये तांत्रिक अडचणीमुळे
3. पेमेंट देताना इंटरनेट कनेक्शनमध्ये व्यत्यय
अकाउंटमधून पैसे कट झाले, मात्र ट्रान्सझॅक्शन फेल असेल तर काय करावे?
1. Paytm App – Paytm App वर डावीकडे वर असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा. यानंतर, 247 Help and Support वर जा. यानंतर, Get help with recent order द्वारे कॅटेगिरी सेलेक्ट केल्यानंतर, Order सेलेक्ट करा. यानंतर आपली तक्रार नोंदवा. 247 Help and Support वर परत जाण्यापूर्वी वरच्या बाजूला Your Recent Tickets दाखविले जाईल. संबंधित Tickets वर क्लिक करून आपण आपल्या तक्रारीची स्थिती जाणून घेऊ शकता किंवा पुन्हा रिप्लाय देऊ शकता.
2. कस्टमर केअर- पेटीएमसह जवळजवळ सर्वच ई-वॉलेट कंपन्या ग्राहकांना कस्टमर केअर सुविधा पुरवतात. पेटीएमच्या कस्टमर केअर क्रमांकावर (बँक, वॉलेट आणि पेमेंटसाठी- 0120-4456456) कॉल केल्यास एग्जिक्यूटिव आपल्याकडून ट्रान्सझॅक्शन आयडी किंवा ऑर्डर आयडी विचारेल. यानंतर आपली तक्रार नोंदवून तक्रार क्रमांक देण्यात येईल.
3. The Ombudsman Scheme for Digital Transactions- आता RBI ने डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना एक मोठे शस्त्र दिले आहे. आता आपण ई-वॉलेट आणि इतर डिजिटल पेमेंट देणार्या कंपन्यांच्या विरोधात लोकपालकडे तक्रार करू शकता. डिजिटल पेमेंट कंपनीकडून समाधानकारक तोडगा न मिळाल्यास देशभरातील 21 लोकपाल कार्यालयात तक्रारी नोंदवता येतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.