अमरावती प्रतिनिधी l बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फायदेशीर असल्याचा अंदाज अमरावतीच्या हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात वेळेवर मान्सून येण्याची शक्यता असल्याने शेतकरी राजा पेरणीस सज्ज झाला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वातावरण मान्सूनच्या वाटचालीकरिता पोषक आहे. आगामी काही दिवसात असेच वातावरणात कायम राहिल्यास केरळच्या किनारपट्टीवर 5 जून रोजी मान्सून दाखल होण्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे 10 ते 15 जून दरम्यान विदर्भात मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.
विदर्भात प्रामुख्याने अमरावती विभागातील शेती मान्सूनच्या पावसावर आधारित आहे. पश्चिम विदर्भात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने मान्सूनच्या पावसावर शेतकरी अवलंबून आहेत. शेतीसह येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून आगमन वेळेवर हे दिलासा देणारे आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.