Monsoon Tourism : पावसाळ्यात ‘या’ उलट्या धबधब्याचा नजारा पाहून अवाक व्हाल; मुंबई- पुणेकरांसाठी जवळचं असलेलं झक्कास डेस्टिनेशन

monsoon tourism Naneghat Reverse Waterfall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालं असून आज मुंबई- पुण्यासह अनेक ठिकाणी पावसाच्या सऱ्या बरसल्या आहेत. पहिल्यांदाच धो धो पाऊस पडल्याने पावसाळ्याच्या या मोसमात बाहेर कुठेतरी पर्यटनाला (Monsoon Tourism) जावं आणि मनसोक्त आनंद घ्यावा अशी इच्छा अनेकांना असते. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या महाराष्ट्रात अनेक निसर्गरम्य ठिकाण आहे, ज्याठिकाणी पावसाळ्यात जाऊन तुम्ही निसर्गाचा आनंद साजरा करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पर्यटन स्थळाबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. ते ठिकाण म्हणजे नाणेघाट येथील उलट्या दिशेला कोसळणारा धबधबा …

Naneghat Reverse Waterfall
Naneghat Reverse Waterfall

नाणेघाट (Monsoon Tourism) हे पुण्यातील जुन्नर जवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेले ठिकाण आहे. मुंबईपासून सुद्धा हे पर्यटन स्थळ अवघ्या ३ तासांच्या अंतरावर आहे. याठिकाणी निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतोय, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. खरं तर नाणेघाट उलट्या धबधब्यासाठी प्रसिद्ध असून खास करून पावसाळ्याच्या दिवसात अनेक पर्यटकांची पाऊले या घाटाकडे वळतात. नाणेघाट धबधब्यातील पाणी उंचीवरून खाली येण्याऐवजी वरच्या दिशेने वाहते. हा धबधबा नेहमी धुक्यात लपलेला असतो. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या धबधब्याची दिशा उलट्या बाजूने जाते. निसर्गाचा हा अनोखा नजारा पाहून नक्कीच तुमचं मन मोहित होईल यात शंकाच नाही.

Naneghat Reverse Waterfall
Naneghat Reverse Waterfall

 

ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम ठिकाण – (Monsoon Tourism)

जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तरीसुद्धा नाणेघाट हे तुमच्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. नाणेघाटच्या ट्रेकिंगसाठी 3 तासांचा वेळ लागतो. परंतु याठिकाणी ट्रेकिंग करणं नक्कीच सोप्प काम नाही. नाणेघाट ट्रेक हा घाटघरच्या जंगलाचा एक भाग आहे. नाणेघाट ट्रेकिंग करताना तुम्हांला निसर्गरम्य आणि साहसी ट्रेकिंगचा आनंद घेता येईल. जर तुम्ही नाणेघाटाबरोबर, भैरवगड आणि माळशेज घाटाला भेट देणार असाल तर राहण्याची सुद्धा सोय आहे.

Naneghat Reverse Waterfall
Naneghat Reverse Waterfall

नाणेघाट धबधब्याला कसे जायचे?

मुंबईहुन नाणेघाट धबधब्याकडे जायचं असल्यास कल्याण बसस्थानकातून जुन्नरला जाण्यासाठी राज्य परिवहनची बस पकडावी. त्याच मार्गावर नाणेघाट धबधबा माळशेज घाट रस्त्यावर वैशाखरे गावाजवळ आहे. तेथून नाणेघाटात जायला २ तास लागतील. तर दुसरीकडे पुण्याहून नाणेघाटात जायचं असल्यास जुन्नर घाटघर मार्गे बसने जावं लागेल.