मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजारांच्या वर पोहोचला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईतील ७ वॉर्डमध्ये 200 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असून 100 जास्त कोरोनाबाधित असलेले एकूण वॉर्ड 13 आहेत. मुंबईतील जी साऊथ प्रभागात (वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर) सर्वाधिक 487 रुग्ण आहेत. तर त्यातल्या त्यात कमी म्हणजेच 20 रुग्ण आर नॉर्थ (दहिसरचा भाग) प्रभागात आहेत.मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत कालपर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या ३ हजार ४५१ असून आतापर्यंत मृत्यू 151 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४०८ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वरळी, प्रभादेवी या विभागांचा समावेश असलेल्या जी/दक्षिण प्रभागात सर्वाधिक ४८७ रुग्ण आहेत. तर भायखळा परिसर येणाऱ्या ई प्रभागात ३४९, दादर, माटुंग्याचा काही भाग असलेल्या जी/ उत्तरमध्ये २५१, कुर्ला, चुनाभट्टी येणाऱ्या एल प्रभागात २४०, धारावी, सायनचा भाग येणाऱ्या एफ/उत्तरमध्ये २२८, अंधेरी पश्चिमेच्या के/पश्चिम प्रभागात २२३, ताडदेव, नाना चौक परिसर येणाऱ्या डी प्रभागात २०७ करोनाबाधित आहेत. तर के/पश्चिम १८१, एच/पूर्व १५४, एम/पूर्व १४९, एफ/दक्षिण ११९, ए प्रभागात ११८ आणि एम/ पश्चिममध्ये १०४ रुग्ण आहेत.
इतर प्रभागात शंभरच्या खाली रुग्ण आहेत. २० ते ९७ रुग्ण संख्या असलेले एकूण ११ प्रभाग आहेत. त्यातही सर्वात कमी रुग्ण दहिसरच्या आर/उत्तरमध्ये आहेत. दहिसरमध्ये अवघे २० रुग्ण आहेत. सी आणि टी प्रभागात प्रत्येकी २३ रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईत कालपर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या ३४४५ असून आतापर्यंत ४०८ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews