जन्मदात्या आईनेच काढला मुलाचा काटा; नेमकं कारण काय?

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेड जिल्ह्यातील बारड इथे आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आई वडिलांना दारू पिऊन मारहाण करणाऱ्या मुलाला ठार करण्यासाठी आईनेच अन्य 2 जणांना सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 3 जण अटकेत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 14 ऑगस्ट रोजी मृत मुलगा सुशील त्र्यंबकराव श्रीमंगले याचा खून झाला होता. याप्रकरणी बारड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाला मृताची आई शोभा त्र्यंबकराव श्रीमंगले यांनी इतर दोन व्यक्तींच्या साथीने हा खून केल्याची माहिती मिळाली.

मुलगा दारु पिऊन नेहमीच घरी आई-वडिलांना मारहाण करत त्रास देत होता. अनेक वेळा समजूत घालूनही तो दारुच्या पैशांसाठी त्रास देत होता. तसंच घर विकून पैशांची मागणी करत होता. नेहमी होत असलेल्या या त्रासाला कंटाळून त्याच्या आईने हे टोकाचे पाऊल उचललं. शोभा श्रीमंगले यांनी भाडेकरु राजेश गौतम पाटील आणि त्याच्या मित्राला 50 हजार रुपयांची सुपारी देऊन सुशीलचा खून करण्यास सांगितलं होत. त्यानंतर या दोघांनीही सुशीलला बारड परिसरात नेले. आणि गळा आवळून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.