सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना साताऱ्यास पाठवले. अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट देखील घेतली मात्र उदयनराजे राष्ट्रवादीत राहण्यास तयार नसल्याचेच कोल्हे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून दिसून येते.
अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्यात बंद खोलीत बराचवेळ चर्चा झाली. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद देखील पार पडली. त्या पत्रकार परिषदेत अमोल कोल्हे म्हणले की मावळा राजांचे मन वळवू शकत नाही. उदयनराजे सारखी स्वयंभू व्यक्तमत्वे स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. त्यामुळे मी त्यांच्या पुढील कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देतो असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत. त्यांना उदयनराजे भाजपमध्ये जणार आहेत काय असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.
अमोल कोल्हे यांना विचारलेला प्रश्नच पुन्हा उदयनराजेंना विचारण्यात आला. काय तुम्ही भाजपमध्ये जाणार आहेत काय. त्यावर उदयनराजे म्हणले की अमोल कोल्हे हे माझे जुने मित्र आहेत. त्यामुळे ते मला भेटायला आले होते. या भेटीला राजकीय रंग देऊ नये. अमोल कोल्हेंना मी भाजपमध्ये जावं आस वाटत नाही. ना त्यांना राष्ट्रवादीत राहावं आस वाटत नाही. त्यांना मी पृथ्वीवर राहावे असे वाटते असे उत्तर उदयनराजेंनी दिले आहे.