ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
स्पर्धापरीक्षा अभ्यासनीती, भाग 29 | नितिन बऱ्हाटे
एखादी मुर्ती घडविताना मुर्तीकार सुरवातीला छिन्नीने मोठे मोठे घाव घालत असतो पण जेव्हा मुर्ती पुर्णत्वाच्या टप्प्यात असते तेव्हा मात्र त्याला खुप काळजीपूर्वक घाव घालावे लागतात खुप बारकाईने काम करावे लागते, तुमच्याकडुनही या स्टेज वर हेच वस्तुनिष्ठ आकलन आणि आचरण अपेक्षित आहे
पुढील ४० दिवसात काय काय करता येईल याबद्दल सदर लेखात चर्चा करुया –
१. गेमचेंजर मराठी+इंग्रजी – भाषा विषयांच्या पेपर बद्दल अधिक जागरुक झाले पाहिजे या शेवटच्या दिवसात, भाषा विषयातील गुणच तुम्हाला शेवटी क्लासवन पद मिळविण्यासाठी मदत करतील. भाषा विपयातील वस्तुनिष्ठ प्रश्नांवर जास्तीत जास्त गुण मिळविण्याची तयारी ठेवा, विस्तृत लेखन प्रश्नांसाठी तुम्ही आतापर्यंत लिहीलेले निंबध, सारांश लेखन, भाषांतर इत्यादी पुन्हा एकदा पाहुन घ्या त्यानुसार कोणत्या घटकाची तयारी करायची आहे त्याची तयारी पुढील दिवसात करुन घ्या, आपल्या मराठी व इंग्रजी निबंध लिहीण्याच्या संरचनात्मक बाबींवर मेहनत घ्या, मार्गदर्शक किंवा मित्रांनी लिहीलेले आदर्श निंबध वाचुन घ्या. इंग्रजी कडे तर बिलकुल दुर्लक्ष करु नका.
२. दररोज नाशट्या सोबत अभ्यासक्रम – मागील दिवसात सर्व अभ्यासक्रम पुर्ण करण्याच्या जिद्द पायी तुम्ही चौफेर मेहनत घेतली असेलच आणि अभ्यासक्रम आवाक्यात आणला असेल, आता चार GS चे एकुण ७४(१९+१५+१८+२२) मुद्दे दररोज बारकाईने वाचत राहीले पाहिजे. त्यानुसार अभ्यासक्रमातील प्रत्येक शब्दावरील आपलं ज्ञान/माहीती याची मनोमन उजळणी करीत राहिले पाहिजे. ज्यामुळे आपल्या दैनंदिन अभ्यासाची उजळणी अभ्यासक्रमकेंद्रीत राहील आणि उजळणीमध्ये कुठे भर द्यायचा कुठे नाही याचा अंदाज येईल.
३. आतापर्यंत चुकलेल्याचे करेक्शन – या स्टेज वर आपले भरपुर वाचुन झालेले असेल आणि पुरेश्या प्रश्नपत्रिका ही आपण सोडविल्या असतील, आता इथुन पुढे प्रश्नपत्रिकेतील स्कोर नुसार प्रश्र्न सोडविण्याच्या तंत्रावर आणि परीक्षेच्या वेळेच्या नियोजनावर काम केले पाहिजे, अधिकाधिक अचुकतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता पर्यंत विविध संस्थाच्या सोडवलेल्या नमुना प्रश्नपत्रिकांमधील वस्तुनिष्ठ प्रश्नांबाबत होणारी गफलत आणि बारकावे शोधुन काढावेत, त्यासाठी आतापर्यंत तुम्ही जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत त्यातील १. चुकलेले २. न सोडवलेले प्रश्न पुन्हा पाहुन घ्या. बरोबर प्रश्न , चुक प्रश्र्न , कोणता घटक ,असा एक चार्ट बनवुन घ्या, त्या चार्टचे सांख्यिकीय विश्लेषण करुन स्वत:च्या अभ्यासातील मर्यादा आणि बलस्थाने शोधुन काढा. त्याचा उपयोग पुढील अभ्यासाची आखणी करण्यासाठी होईल
४ .दुर्लक्षित घटक – परीक्षेच्या एका महिना आधी नवीन अभ्यास साहित्य पुर्णतः टाळले पाहिजे म्हणुनच पुढील १० दिवसात पुढील प्रकारचे घटक विशेषतः उजळणी केले पाहिजेत
a. पुर्वला नसलेले फक्त मुख्य ला असलेले,
उदा. कायदे, आपत्ती व्यवस्थापन, मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय संघटना,अवकाश आणि तंत्रज्ञान इ.
b. ज्या घटकांना आपण खुप कमी वेळ दिला आहे,
c. जे घटक कीचकट वाटतात ,लवकर समजत नाहीत पण परीक्षेला हमखास विचारले जातात
५. सराव प्रश्नपत्रिका विरुद्ध आयोगाच्या प्रश्नपत्रिका – आता अजुन क्लासेच्या नवीन नमुना प्रश्नपत्रिका सोडवण्या ऐवजी जसे सुरवातीच्या टप्प्यात आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका बारकाईने विश्लेषण करुन सोडविला होत्या तसे आताही शेवटच्या टप्प्यात आयोगाच्या प्रश्नपत्रिकाच सोडविल्या पाहीजेत. त्या सोडवील्याने पुढील फायदे होतील
a.आयोगाचा प्रश्नस्तर, स्वरुप आणि क्लुप्त्या इत्यादीची उजळणी होईल.
b. आयोगाच्या प्रश्नस्वरुपानुसार मेंदू ला विचार करण्याची सवय लागेल.
c. अभ्यासक्रमातील घटकांचे कमी जास्त महत्त्व लक्षात आल्याने सदर घटक तुम्ही पुन्हा डोळ्या खालुन घालाल.
d. मागील प्रश्नांचे विश्लेषण केल्यास सुमारे 20% प्रश्न रिपीट होतात यामुळे आतापर्यंत येणा-या तुमच्या गुणांमध्ये निदान १०% गुणांची वाढ होईल
६. विसरणारे तथ्य – आताचे १०-१५ दिवस दररोजच्या दिवसातील ठराविक १/२ तास सतत विसरणार्या घटकांना दिले पाहीजेत, त्याचे तक्ते, नकाशे, आकृती, शाॅर्टकोड्स इत्यादी आधारे दररोज उजळणी केली पाहिजे. उदा. घटनात्मक कायदे, समाजसुधारक आणि त्यांचे साहित्य, विविध संस्था/आयोग कार्ये, चर्चेतील कायदे/विधेयक, महीला/बाल विकास योजना, इत्यादी.
७. अभ्याससाहीत्य कमी करत जा – पुस्तकांचा ढीग, फोटोकाॅपीचे गठ्ठे तुमच्या वर मानसिक दबाव तयार करीत राहील, नको असलेले नजरेआड करुन टाका, कुठलेही पुस्तक घेतले व पूर्ण वाचून काढले असे न करता लागेल तितके वाचावे, अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचे साहित्य अभ्यासुन, उजळणी करुन किंवा शार्टनोट्स आधारे कमीत कमी करत जा, त्यासाठी पुढील ३० दिवसांत वाचण्याचे साहित्य, शेवटच्या आठवड्यात वाचण्याचे साहित्य आणि शेवटच्या दिवशी वाचण्याचे साहित्य यांची शक्य असल्यास यादी बनवुन ठेवा किंवा निदान डोक्यात स्पष्टता ठेवा. पुढील दिवसात मनोधैर्य खच्चीकरण करणारे मित्र, घटना, प्रसंग किंवा कृती अशा सर्व गोष्टींना फाटा द्या. मुख्य परीक्षेपर्यंत आत्मविश्वासाची पातळी नेहमी चढती ठेवा. मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे प्रकर्षाने लक्ष द्या.
८. तणाव व्यवस्थापन( stress management) – आयुष्य आहे तर आनंद व अस्वस्थतता असणार, आणि परीक्षा आहे तर तणाव वाटणारच पण त्याच्या कडे दुर्लक्ष करणे सर्वस्वी आपल्या हातात असते, हातात नसलेल्या गोष्टींची चिंता करण्याऐवजी अभ्यासाचे चिंतन करा, सकारात्मक विचार व दररोजच्या अभ्यासातील प्रगती यामुळे आपली अस्वस्थता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल.
९. MPSC च्या इतर पदांसाठी २०१९ मध्ये झालेल्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका(अभ्यासक्रमा संबंधित) एकदा सोडवुन घ्या, जेणेकरून आयोगाचा प्रश्न विचारण्या संबंधीचा अगदी लेटेस्ट ट्रेंड समजुन येईल.
मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे एकुण गुण MPSC तील पद ठरवतात, तिथे एका एका गुणाला खुप महत्व असते, एक गुण तुमचे मेरीट लिस्ट मधुन बाहेर पडणे, क्लास टु वरुन क्लास वन मिळविणे, तसेच महाराष्ट्रात दुसर्या क्रंमाकावरुन पहिले येणे ठरवुन शकते. म्हणुन हा एक एक गुण मिळविण्यासाठी शेवटचे ४० दिवस चतुरस्त्र अष्टावधानी राहुन झटले पाहिजे.
आतापर्यंतच्या अभ्यास आकलना नुसार चारही सामान्य अध्ययन पेपरची आणि भाषा विषयाची रणनीती आखुन घ्यावी, त्यानुसार कोणत्या पेपर मध्ये तयारी करायची राहीली आहे? कुठे गुण जास्त मिळविता येतील ? कुठे गुण येत नाहीत? वेळ कुठे कमी पडतो ? अशा जमेल तेवढ्या समस्यांची यादी बनवुन प्रत्येक समस्येवर वेळ ठरवुन परफेक्शनपर्यंत पोहचले पाहिजे
जीवाची बाजी लावुन उजळणी करा, स्वतःच्या अभ्यासावरील शेवटचा हात फिरवा, झालेला अभ्यास, स्वतःची प्रगती आणि मुख्य परिक्षेच्या अपेक्षा या त्रिमीती मध्ये आपण कुठे आहोत हे तपासून घ्यायला पाहिजे . “तुमचा कितवाही अटेम्ट असला तरी पोस्ट यावर्षीच मिळविण्यासाठी लढत रहा, शेवटी तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात”.
नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)
तुम्ही MPSC चा अभ्यास करत असाल तर खालील लेख वाचायला अजिबात विसरू नका.
खुशखबर! MPSC च्या पदसंख्येत वाढ
राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहीरात आली…! आता काय…?
“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा……”
MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा
“2019 MPSC पुर्व परिक्षेतील CSAT ची तयारी कशी करावी ….??”
इतर महत्वाचे –
भाग १ – स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख
भाग २ – UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा
भाग 3 – स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट
भाग ४ – तर मग UPSC /MPSC करू नका ???
भाग ५ – UPSC/MPSC का करावी ???
भाग ६ – महापरिक्षेचे महाभारत, स्पर्धापरिक्षा विद्यार्थी हैराण
भाग ७ – मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच
भाग ८ – निबंधाचे तत्वज्ञान UPSC 2018
भाग 9 – कनेक्टिंग द डाॅटस् …UPSC Mains 2018
“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?