बोरिवलीमध्ये इमारतीला लागली आग, आगीत 14 जण अडकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बोरिवली : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये इमारतीमध्ये आग (Fire) लागल्याच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही आहेत. शनिवारी रात्री रात्री मुंबईतील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर भीषण आग (Fire) लागली होती. या आगीमध्ये 14 जण अडकले होते. सुदैवाने या भीषण आगीमध्ये (Fire) कोणतीही जीवितहानी झालेली नाही सगळ्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बोरिवलीतील इमारतीमध्ये लागलेल्या या आगीच्या (Fire) घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आग (Fire) लागल्याचे समजताच याची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. नेमकी कोणत्या कारणामुळे ही आग पसरली हे मात्र समजू शकलेले नाही.

बोरीवलीत कुठे अग्नितांडव?
बोरीवली परिरात असलेल्या धीरज सवेरा या इमारतीमध्ये हि आग (Fire) लागली होती. या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर ही लागली. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट निर्माण झाली होती. ही आग (Fire) लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवान लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आलं. हि आग (Fire) विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.

कशामुळे आग लागली होती?
शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ठिणगी पडून हि आग (Fire) लागल्याचे समजत आहे. या आगीमध्ये इमारतीमधील चौदाव्या मजल्यावरील एकूण दोन फ्लॅट्स आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात फ्लॅट्समधील मौल्यवान सामान जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे पण वाचा :
बीड जिल्हा रुग्णालयात जोरदार राडा, आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या पती आणि सासूला मारहाण

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी धरला पंजाबी ढोलवर ठेका

अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलकांची मुंबई मेलवर दगडफेक

मी ईडीच्या चौकशीला तयार, तुमच्यात दम आहे का?

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

 

Leave a Comment