मुंबई प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या आता ८९ झाली आहे. काल संध्याकाळपासून राज्यात एकुण १५ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे मागील १२ तासांत एकट्या मुंबईत कोरोनाचे नवीन १० रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात एक नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे. मुंबईसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.
दरम्यान, असे असूनदेखील मुंबईकर कोरोनाला गांभिर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी जमाव बंदीचे आदेश दिलेले असतानाही आज सकाळ पासून मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुक दिसत आहे. मुंलुंड टोलनाक्यावर सकाळी ९ च्या दरम्यान वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. यामुळे मुंबईकरांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून
राज्यातील लॉकडाउनच्या काळात काय ‘सुरु’ काय ‘बंद’
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश
धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न
धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास
मोठी बातमी! ३१ मार्च पर्यंत मुंबईची लोकलही बंद, रेल्वे मंत्रालयाचा सर्वात निर्णय
लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!
सोळा दिवसांच्या उपचारानंतर १३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात