मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खंद्या सर्मथक असणाऱ्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा घेतलेला निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेला आहे. तर चित्रा वाघ यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे खरे कारण काय आहे यावर राजकीय वर्तुळात चांगलाच खल रंगला आहे. चित्रा वाघ यांनी शुक्रवारी रात्री आपल्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याच प्रमाणे त्यांनी राजकीय भूमिका काही दिवसांनी जाहीर करू असे देखील सांगितले.
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अहवाल ग्रन्थपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०१६ साली नुकसान भरपाईचा धनादेश देण्यासाठी ४ लाखाची लाच मागितली होती. त्या प्रकरणात त्यांना लाज लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक देखील केली होती. त्यांच्या समवेत अन्य दोघांना देखील अटक करण्यात आली होती. किशोर वाघ यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय उत्कर्ष साधण्यासाठी चित्रा वाघ या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
दरम्यान राष्ट्रवादीत त्यांना समान दर्जा दिला जात नव्हता म्हणून त्या नाराज होत्या असे देखील कारण चित्रा वाघ यांनी पक्ष सोडण्यावर सांगण्यात येते मात्र यात किती तथ्य आहे हे सांगता येणार नाही. त्यामुळे विधानसभेची निवडणूक अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे हे मात्र नक्क्की आहे.
म्हणून चित्रा वाघ यांनी सोडली राष्ट्रवादी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ
राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त
महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार
दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?