महापालिकेची पोटनिवडणूक स्थगित; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणूका स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या प्रभाग १६ अ ची पोटनिवडणूक स्थगित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज महापालिकेला प्राप्त झाले.

सांगली महापालिकेच्या प्रभाग १६ अ ची पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. ही जागा नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी राखीव आहे. या जागेसाठी काल सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. या मुदतीत काँग्रेसकडून तोफिक शिकलगार, भाजपकडून अमोल गवळी आणि राष्ट्रवादीकडून उमर गवंडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज अर्ज छाननीची मुदत होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुका स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आज राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून प्रभाग १६ अ ची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग १६ अ ची पोटनिवडणूक तात्काळ स्थगित करून त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्याची सूचना केली आहे.

Leave a Comment