आता सोन्याच्या कर्जावरील व्याजाच्या ऑनलाइन पेमेंटवर मिळवा कॅशबॅक, ‘या’ कंपनीने सुरू केली नवीन योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुथूट फायनान्सने कोरोना महामारीच्या मध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक कॅशबॅकची योजना मुथूट ऑनलाईन मनी सेव्हर प्रोग्राम (एमओएमएस) सुरू केली आहे. NBFC ने ऑनलाइन कर्जावर व्याज भरणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्ड लोन MOMS ही योजना सुरू केली आहे. याअंतर्गत आता ऑनलाइन व्याज भरणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. सध्याच्या कोविड -१९ च्या दरम्यान ग्राहकांमध्ये डिजिटल पेमेंटसला प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेनुसार मुथूट फायनान्सचे ग्राहक कॅशबॅकमध्ये 1501 रुपयांपर्यंतची कमाई करू शकतात. ही योजना सध्या फक्त कंपनीच्या वेबसाइटवरच उपलब्ध आहे, मात्र ती 31 जुलैपूर्वी iMuthoot या अ‍ॅपवर उपलब्ध होईल. ऑनलाइन पेमेंट करताना ग्राहकांना कॅशबॅकची रक्कम दाखवली जाईल आणि देय व्याजातून ती रक्कम कमी करुन ते व्याज भरण्यास सक्षम असतील.

या योजनेसंदर्भात मुथूट फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अलेक्झांडर मुथूट म्हणाले, “डिजिटल पेमेंट्समध्ये गती येण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना मुथूटलाइनलाइन डॉट कॉम आणि iMuthoot या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन सोन्याच्या कर्जावर व्याज देणाऱ्या ग्राहकांना एक खूपच चांगली व्याज कॅशबॅकची ऑफर देतो आहे.

कॅशबॅक किती असेल
मुथूट फायनान्सच्या मते, 50,000 हजाराहून अधिक व्याज भरल्यावर 1501 रुपयांचे कॅशबॅक उपलब्ध होईल. दुसरीकडे, 251 ते 49,999 च्या व्याजाच्या भरणावर 601 रुपये, 10,000 ते 24,999 च्या व्याजाच्या भरणावर 201 रुपये, तर 5000 ते 9,999 रुपये व्याजाच्या भरणावर 101 रुपये आणि 2500 ते 4,999 रुपये व्याज भरणावर 51 रुपये कॅशबॅक देण्यात येईल.

डोर स्टेप गोल्ड लोन सुविधा देखील
यापूर्वी, मुथूट फायनान्सने Loan@Home नावाची सेवा सुरू केली. या अंतर्गत या एनबीएफसी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सोन्यावर कर्ज देतील. यासाठी ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. सध्याच्या कोरोना कालावधीत लोकांच्या घराबाहेर पडण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर मुथूट फायनान्सने हे पाऊल उचलले आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मुथूट फायनान्सच्या मोबाइल अ‍ॅपवर किंवा त्याच्या वेब पोर्टलवर अर्ज करावा लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.