दिवाळी विशेष लेख | जय जगदाळे
लहानपणी दिवाळी हा फक्त उत्सव नव्हता, डोक्यावर घमेल्या मधे मती आणणे, किल्ले बनविणे, दिवाळीत नवीन कपडे घेणे, फटाके फोडणे, दीवाळी उत्सव नव्हता तर भावना होती. पहिला फटका फोडण्यासाठी सकाळी लवकर उठणे ही त्यावेळी स्पर्धा होती. आपल्या किल्ल्यावर लक्ष्य ठेवणे ते ही शेवटच्या दिवसापर्यंत आणी त्याचे रक्षण करणे ही माझ्यासाठी दिवाळी होती, मला दिवाळीच्या फराळात जास्त रस नव्हता. माझ्या बालेकिल्ल्यात तोफ, धबधबा, एरगन आदी मॉडेल्स वापरण्यासारख्या माझ्या आवडी भिन्न होत्या. मी माझे सर्व अभ्यास शाळेतच पूर्ण करायचो जेणेकरून मी किल्ला बांधण्यासाठी अधिक वेळ देऊ शकलो, किल्ले बनवताना मी संपूर्ण महिना अगोदर पासून तैयारी करायचो. किल्ल्यांकडे मला बरीच बक्षिसे मिळाली. हे माझे कौशल्य आता बालापासूनच्या तरुणाई पर्यंतचा प्रवासात गमावले आहे.
दिवाळी कशी असावी याकडे तुमचे लक्ष वेधू इच्छित आहे, लोक म्हणतात की फटाके फोडू नका, ते प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात. लोकांच्या या दृष्टिकोनाचा मी तीव्रपणे विरोध करतो, जेव्हा मी लहान होतो तेव्हा “आम्ही मुले आहोत अमल फटाके वजवू दया” जर तुम्हाला प्रदूषणाची इतकी काळजी असेल तर मोटार वाहनांचा वापर कमी करा, सिगारेट ओढणे थांबवा, दारू कारखानेही थांबवा ज्यामुळे प्रदूषण अधिक होते, आपण लोक आम्हा बालकांना वर निर्बंध का घालता, तर कारखान्यावर का नाही. फटाके प्रदूषण करतात म्हणून, लहान मुलांना दिवाळीचा आनंद लुटण्यापासून थांबवू नका, कारण आम्हाला पहा आम्ही फक्त दिवाळी औपचारिकता/फॉर्मेलिटी म्हणून साजरी करतो, फोटो काढून वॉट्सएप्प, इंस्टाग्राम वर पोस्ट करतो आणी घरात बसतो, ना फटाके फोडतो ना किल्ले बनावतो न फक्त मोबाइल आणि सामाजिक/सोशल मीडिया वर पोस्ट करतो. मला कधी-कधी वाटतं परत एकदा लहान होऊन दिवाळी साजरी करावी पण नंतर लक्षात येतं की आता आपण शर्यतीत आहोत अता कोणताही पर्याय नाही.”अरे गेले ते दिवस , आता राहिल्या फक्त आठवणी” म्हणून म्हणतो आपल्या मुलांना आनंद घेऊ द्या, नाही तर त्यांचा जवळ आठवणी ही राहणार नाही. दिवाळी मनापासून साजरी करू द्या.
या वर्षाच्या दिवाळीचं काय एक मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर, माझ्यातील लहान मूल आनंदाने लडबडत आहे, नाचत मला किल्ले बनवण्यास खेचत आहे. आपल्या मित्रांनी प्रथम फाटका फोडण्यापूर्वी तू जाऊन फाटका फोड, पण माझ्यामधील एक तरुण म्हणते की तुम्हाला नियतकालिका, असाइनमेंट्स पूर्ण करायचे आहेत, सेमिस्टर येत आहेत . लहान मुलासारखे दिवाळी साजरी करू शकत नाही म्हणून मी पुन्हा म्हणतो की त्यांना थांबवू नका.
(लेखक हे साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये नॅनोसायन्स विभागात प्रथम वर्षाला शिकत आहेत.)