हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. सभागृहातून एकदम निघून जाणे हे राज्यपाल यांच्या पदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. आज ‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात ‘भाजपाल”, असे आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
कालपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली यावेळी भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आले. तर महाविकास आघाडीकडून राज्यपालांच्या आक्षेपार्ह्य विधान व सभागृहातून निघून जाण्याच्या मुद्यांवरून अंदोलन करण्यात आले. राज्यपालांच्या आक्षेपार्ह्य विधान व सभागृहातून निघून जाण्याच्या मुद्यांवरून आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपल्या ट्विट मधून राज्यपाल व भाजपवर टीका केली आहे. प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल असे असल्याचे पटोले यांनी म्हंटले आहे.
दरम्यान पटोले यांनी काल माध्यमांशी संवाद साधत राज्यपालांवर टीका केली होती. यावेळी ते म्हणाले की, विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे.
हर राज्य में राज्यपाल होता है, महाराष्ट्र में 'भाजपाल' है|
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 4, 2022
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करु, शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपाल कोश्यारी व भाजपला आवडो वा ना आवडो जयजयकार कोणीही थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज व महात्मा फुले तसेच सावित्रीमाईंबद्दल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो,असे पटोले म्हणाले होते.