हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावेळी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पंतप्रधानांनी केला. छत्रपतींच्या विरोधातली मानसिकता स्पष्ट दिसतेय,” अशी टीका नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केली.
काँग्रेसच्या वतीने आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी जी विधाने पावरली आहेत. त्यावरून राज्यपाल देखील अपमान करतात. आहे दिसत आहे. भाजपसाठी नरेंद्र मोदींच देव आहेत असे वर्तन भाजपचे आहे, राजमुद्रा आणि छत्रपतींचा अपमान करण्याचा कॉन्ट्रॅक्ट भाजपने घेतले आहे काय?,” असा सवालही नाना पटोलेंनी यावेळी उपस्थित केला.
LIVE: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद https://t.co/np4oUaUwHa
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 6, 2022
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुणे दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या निषेधावर पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी गो बॅकचे नारे पुण्यात बघायला मिळत आहे. देशभरात मोदींचा विरोध होतोय. पुण्याच्या जनतेची मोदी गैरसोय करता आहेत. पुणेकर देखील भाजपवर नाराज दिसत आहेत, असे पटोलेंनी यावेळी सांगितले.