हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार स्थापनेच्या घटनेला अडीच वर्षे उपटून गेलेली आहेत. मात्र, या पहाटेच्या शपथविधीवरून कधी भाजप नेते अजित पवारांना तोळे लगावत आहेत. तर कशी शिवसेना भाजपला. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना शपथविधीवरून डिवचलं आहे. अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार? असा सवाल पटोले यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसापासून महा विकास आघाडी सरकारमधील पक्षात धुसफूस सुरु आहे. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राष्ट्रवादीवरच हल्लाबोल केला असून राष्ट्र्वादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असे म्हंटले आहे. त्यानंतर त्यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधत अजित पवारांवर निशाणा साधला. यावेळी पटोले म्हणाले की, अजित पवार यांनी आता लवकर सांगावे कि पहाटेच्या शपथविधीबाबत कधी उत्तर देणार? असा सवाल पटोले यांनी केला आहे.
महा विकास आघाडीबाबत मोठं विधान
यावेळी पटोले यांनी महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहण्याबाबतही मोठे विधान केले. ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचा राजकारण करत आहे. अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनले होते. त्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील. येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, असेही शेवटी पटोले यांनी म्हंटले.