Wednesday, October 5, 2022

Buy now

“संजय राऊत तुझी कुंडली माझ्याकडे, लवकरच बाहेर काढणार”; नारायण राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप आणि पक्षाच्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले. यावरून आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर निशाणा साधला. “कालच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना घाम का फुटला होता? ते म्हणतात शिवसेना मर्द आहे. मर्द माणसाला मर्द सांगण्याची आवश्यकता नाही वाटत. ते म्हणतात की मी कोणाला घाबरत नाही. ज्यावेळी शरद पवार यांच्याकडे उद्धव ठाकरे गेले त्यावेळी त्यांच्याबरोबर राऊत होते. संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे. मी आज ओळखतो का? राऊत तुझी कुंडली माझ्याकडे, लवकरच बाहेर काढणार,” असा इशारा राणे यांनी दिला

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, संजय राऊत हा पगारी नेता आहे. त्यांनी सांगावे कि त्यांना कालच्या पत्रकार परिषदेत घाम का आणि कशामुळे फुटला? त्यामागचे कारण हे आहे कि राऊतांना विरोधकांनी फोडला होता, हे सांगण्यासाठी मी मुद्दाम ही पत्रकार परिषद घेतली आहे. संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. राऊतांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. राऊत पूर्ण राष्ट्रवीदीचे आहेत. संजय राऊत लोकप्रभात असताना उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं,असेही राणे यांनी म्हंटले

राऊत शिवसेनेबद्दल बोलतो, शिवसेना, बाळासाहेब, मला आशीर्वाद आहे. लोकप्रभात असताना राऊतांनी उद्धव आणि बाळासाहेबांवर टीका करण्याचे सोडले नाही. राऊत तू काय विचाराचा आहेस हे आम्हाला माहीत आहे. प्रवीण राऊत यांच्या ईडीच्या जबाबनंतर संजय राऊतांना काय झालं? यामागचे पुरावे राऊतांनी द्यावे.

माझा राऊतांना सवाल आहे की, अलिबागमध्ये तू पन्नास एकर पन्नास लाखात घेतली आहेस तर सुजित पाटकर तुझा कोण लागतो? त्याच्या कंपनीत तुझ्या मुली डायरेक्टर कशा? संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवादीचा आहे. तुझी पूर्ण कुंडली माझ्याकडे आहे. ती लवकर बाहेर काढणार आहे, असा इशारा राणेंनी दिला.