टीम, HELLO महाराष्ट्र। राज्यात महिनाभर सुरु असलेलं सत्ता नाट्य संपले आणि एका नवीन आघाडीचा उदय होत महाविकास आघाडीचे सरकार सत्त्तेत आले. हे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी या सरकाराव टीका करण्यास सुरवात केली आहे. महत्वाचं म्हणजे राणे पिता पुत्रांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सतत टीका करणाऱ्यात येत आहे. या टीकेला आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतित्युत्तर दिलं आहे.
ठाकरे सरकार न म्हणता राज्यसरकार म्हणावं असा आक्षेप राणेंनी घेतला होता. त्यावरून जाधव यांनी राणेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना जाधव म्हणाले, नारायण राणेंच्या वक्तव्याला सध्या कुणीही कवडीची किंमत देत नाही. तर राणे यांचं राजकीय क्षेत्रातील महत्वही संपले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचे योगदान नसल्याने त्यांना कुणीही मानत नाही. कोकणचा विकास करायचे ते नेहमीच म्हणतात, मात्र दिल्लीत त्याचं कधीच तोंड उघडत नसल्याचा टोलाही जाधव यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना जाधव म्हणाले, राजकारणात आपलं अस्तीत्व टिकवण्यासाठी राणेंची केविलवाणी धडपड सुरु आहे. राणेंचा पायगुणच असा आहे की, ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागतो. त्यामुळेच भाजपला देखील सत्ता गमवावी लागली आहे. तसेच स्वतःला खूप अभ्यासू आणि मोठा वक्ता समजणाऱ्या राणेंना दिल्लीत चर्च वाक्य तरी बोलता येतात का? असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.




