महाजनादेश यात्रा : नरेंद्र मोदींनी केली भाषणाची मराठीतून सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या शक्ती प्रदर्शनासाठी नाशिकमध्ये मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. त्या सभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी मधून केली आहे. रामाच्या आणि सीतामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या धरतीला मी नमन करतो असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

आदिमाया शक्तीचे रूप असलेल्या सप्तशृंगी मातेच्या पदस्पर्शाने हि भूमी पावन झाली आहे. त्यामुळे या भूमीला मी शत शत नमन करतो असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. याच सभेत भाषण करण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांचा व्यसपीठावर उपस्थितीत असलेले उदयराजे भोसले यांनी शिंदेशाही पगडी घालून सत्कार केला आहे. त्याच पगडीला उद्देशून नरेंद्र मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी मला हि पगडी घातली हे माझे शिवाजी महाराजांच्या प्रति दायित्व वाढवणारे आहे.

मुंबईच्या चकचकीत प्रकाशात रमलेल्या पूर्वीच्या राज्यकर्त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास रखडला. तसेच ग्रामीण महाराष्ट्रात विकासाचा अनुशेष राहिला आहे असे म्हणून नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.