नाशिक हादरलं ! पंचवटी परिसरात वडील आणि मुलाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकमधील पंचवटी परिसरात वडील आणि मुलाने आत्महत्या (Sucide) केली आहे. वडील आणि मुलाच्या आत्महत्येमुळे परिसरात परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जगदीश जाधव असे मृत वडिलांचे आणि प्रणव जाधव असे मृत मुलाचे नाव आहे. नाशिकमधील पंचवटी परिसरात ही घटना घडली आहे. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव यांनी नाशिकमधील आपल्या राहत्या घरात गळफास (Sucide)घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मात्र, दोघांनी आत्महत्या (Sucide) का केली? आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

म्हसरूळमध्ये 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
नाशिकमध्ये एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. नाशिकमधील म्हसरूळ परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतक तरुणाचे नाव राजेंद्र गांगुर्डे असं आहे. पूर्ववैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून राजेंद्र गांगुर्डे याची हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

Leave a Comment