हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी | savitribai phule pune university : स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सहयोगी प्राध्यापक वैभव जाधव यांनी मौलाना आझाद यांच्या जीवनाची आणि शैक्षणिक कार्याची माहिती विभागातील विद्यार्थ्यांना दिली.आझाद यांच्या पुढाकारानेचं यूजीसी,आयआयटी आणि जामिया मिलिया आदी शिक्षणं संस्था उभ्या राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तर प्राध्यापक गायत्री चौकाडे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. यावेळी विभागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.
सन 2008 सालापासून मानव संसाधन विकास मंत्रालयाने मौलाना आझाद यांचा 11 नोव्हेंबर हा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून घोषित केला आहे.यंदाच्या वर्षाची थीम “चेंजिंग कोर्स, ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन” आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.unipune.ac.in/
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा