ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

काश्मीरमध्ये आजपासून ‘पोस्टपेड मोबाइल’ सेवा पूर्ववत

काश्मीर खोऱ्यात गेले ६९ दिवस संचारमाध्यमांवर असलेले निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून, या ठिकाणचे सुमारे ४० लाख पोस्टपेड मोबाइल दूरध्वनी सोमवार दुपारपासून कार्यरत होतील, असे जाहीर केले आहे. देशभर दूरदर्शनवरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या श्रीनगरमधील पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव व प्रवक्ते रोहित कन्सल यांनी ही घोषणा केली. तथापि, २० लाखांहून अधिक प्रीपेड मोबाइल दूरध्वनी, तसेच मोबाइल व इतर इंटरनेट सेवा सध्या बंदच राहणार आहेत.

मतदारांनो जादूचे प्रयोग बघा; बसपाकडून वाशिममध्ये अनोखा प्रचार

मतदारांच्या दारोदारी जाऊन त्यांना आवाहन करणं तसेच गावागावात सभा घेणं हे प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र वाशीममध्ये बसपाकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधून घेत आहे.

गांधीजींनी आत्महत्या कशी केली? गुजरातमधील शाळेने परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाने खळबळ

महात्मा गांधी यांनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारून गुजरातमधील एका शाळेने खळबळ उडवली असून गुजरातच्या शिक्षण विभागाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. आणखी एका अशाच प्रश्नामुळे गुजरातच्या शिक्षण अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. गुजरात राज्यात दारुबंदी असताना दारू गाळण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. गांधीजींनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न गांधीनगरमधील सुफलम शाळा विकास संकुलातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाने शिक्षण अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे.

निवडणूक ही बॅलेट पेपरवरच व्हावी – प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार

देशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या समस्या सोडवायलाही येत जा असा खोचक संदेश राज ठाकरेंनी दिला.

मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी

एवढी वर्ष काँग्रेसला सत्ता दिली असली तरी देशातील जनता मात्र गरीबच राहिली. काँग्रेसने आजपर्यंत देशाचा कोणताही विकास केला नाही यावर चिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत मी फोकनाड नेता नसून जे बोलतो ते करून दाखवितो असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी धामणगाव रेल्वे येथील जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केलं.

मैदानात पैलवान नाही म्हणता, मग मोदींना दिल्लीवरून कशाला बोलावता ; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

आम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी कुणी ऐकलं नाही आणि कुणी त्यांना पाहिलंही नव्हतं.

फसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात

सध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न याबाबत सरकार बोलणं टाळत असून घोषणांच्या जाहिरातबाजीत वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही खर्गे यांनी केली.

पेट्रोलचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता

लाल समुद्रातून जाणाऱ्या इराणच्या तेल टँकरवर शुक्रवारी रॉकेट हल्ला करण्यात आला. सौदी अरेबियाच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. गेल्या काही महिन्यांपासून या भागात इराण आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. रॉकेट हल्ल्यामुळे इराण आणि सौदी अरेबियाचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. या हल्ल्यासंबंधी सौदी अरेबियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.