धक्कादायक! दिल्लीत १२२ सीआरपीएफ जवान करोनाबाधित; आणखी १२ जवानांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना वेगानं फैलावत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे देशात कोरोनाच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या डॉक्टर,पोलीस, सफाई कर्मचारी यांच्यावर कोरोनाने झडप घातली आहे. दरम्यान, दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीफ) आणखी १२ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या सीआरपीएफ जवानांची संख्या आता १२२ वर पोहोचली आहे. तर, आणखी १५० जवानांच्या टेस्टचे रिपोर्ट्स येणे बाकी असून ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोरोनाची लागण झालेले हे सर्व जवान एकाच बटालियनचे आहेत. ही बटालियन राजधानी दिल्लीच्या मयूर विहार फेझ-३ येथे तैनात आहे. सीआरपीएफच्या ३१ बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक मोहम्मद इकराम हुसेन याचा करोनामुळे २८ एप्रिलला मृत्यू झाला होता. त्यांनी सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. कोरोनाचा हा विषाणू आता अर्धसैनिक दलापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ५५ वर्षीय हुसेन यांच्या निधनाबाबत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला होता. दरम्यान, देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment